कळंबोलीतील डी.एन .मिश्रा स्वगृही परतले
भारतीय जनता पक्षाला राम राम ठोकला
खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते बांधले शिवबंधन
पनवेल/प्रतिनिधी:-कळंबोली येथील भाजपचे पदाधिकारी डी.एन.मिश्रा यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला.शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवतिर्थावर सेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते मिश्रा यांच्या हातात शिवबंधन बांधले.मिश्रा हे पुर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत.ते पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षाला बळकटी येईल असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.
डि.एन.मिश्रा हे शिवसेनेचे कळंबोली शहर प्रमुख होते.त्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न केले.वरिष्ठ पातळीवर सुध्दा मिश्रा यांचे चांगले संबध होते.त्यांचा थेट मातोश्रीवर संपर्क होता.ते शिवसनेकडून पनवेल महानगरपालिकेची प्रभाग आठमधुन निवडणुक लढले होते.मुळचे उत्तर भारतीय असलेल्या डि. एन. मिश्रा यांचा पनवेलच्या सामाजिक व राजकिय क्षेत्रात दबदबा आहे.गोरगरिब गरजुंच्या मदतीला धावुन जाणारे कार्यकर्ते म्हणजे मिश्रा अशी त्यांची ओळख आहे.मध्यंतरी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.पक्षाने त्यांना महत्वाची जबाबदारीही दिली होती.मात्र हाडाचे शिवसैनिक असलेले डी.एन मिश्रा भाजपात रमले नाहीत.त्यांनी शनिवारी शिवतिर्थावर शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी खासदार अनिल देसाई,आमदार सदा सरवणकर,रायगडचे संपर्कप्रमुख दत्ता दळवी,जिल्हा प्रमुख शिरिष घरत,जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील,महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांच्यासह पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.