गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार- सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील
पनवेल दि. 27 (संजय कदम): अडी-अडचणीत असलेल्यागोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत नवनिर्वाचित सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील यांनी पदभार स्विकारल्या निमित्ताने व्यक्त केले आहे.
सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्व नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा, लस लवकरच उपलब्ध होत आहे. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या नियम व अटींचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे मालमत्ते संदर्भात तसेच इतर गुन्ह्यांसदर्भात फिर्यादी व तक्रारदारांनी प्रथम सामोपचाराने वाद मिटत असेल त्यासाठी प्रयत्न करावा. सर्व पोलिस ठाणे नागरिकांसाठी 24 तास खुले असून तेथे तुमच्या तक्रारी घेतल्या जातील व न्याय मिळवून देण्यात येईल. कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच पोलिस खात्यानेसुद्धा अहोरात्र मेहनत घेतली आहे. यात अनेक चांगले अधिकारी व कर्मचारी बाधित झाले होते व अनेकांचा दुर्दैवी मृत्युही झालेला आहे. यासाठी सर्वांनी वेळीच औषोधोपचार करून घेणे महत्वाचे आहे. कोणत्याही गोर गरीबांवर अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्या काही अडी अडचणी असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा असे आवाहनसुद्धानवनिर्वाचित सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन भोसले पाटील यांनी केले आहे.