पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अभ्यास दौरा अध्यक्ष केवल महाडिक यांच्या नेतृत्वात शिमला – कुलू- मनाली अभ्यास दौरा यशस्वी.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल तालुक्यातील पत्रकारांच्या संघटनांची फादर बॉडी म्हणून ओळखली जाणारी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती नेहमीच पत्रकार एकजुटीसाठी सातत्याने झटत आलेली आहे. नुकतीच नवनिर्वाचित समितीच्या नियोजनानुसार पनवेल तालुका संघर्ष समिती शिमला – कुलू- मनाली येथे अभ्यास दौऱ्यासाठी रवाना झाली होती. सदरच्या अभ्यास दौऱ्यासाठी यंग, डायनामिक आणि डॅशिंग पत्रकार केवल महाडिक यांची अभ्यास दौरा अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली होती. अभ्यास दौरा अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व कोर कमिटीच्या सहकार्याने केवल महाडिक सदस्यांना विरंगुळा म्हणून आणि श्रमपरिहार म्हणून अभ्यास दौऱ्याचे नियोजन केले. त्यानुसार सर्व सदस्यांच्या सहकार्याने यंदाचा अभ्यासदौरा देखील तितकाच माहितीपूर्ण आणि प्रत्येक सदस्याला नवीन अनुभव देणारा ठरला या दौऱ्यादरम्यान शिमला कुलू मनाली येथील थंड वातावरणाचा परिपूर्ण अभ्यास सर्व सदस्यांनी केला तसेच प्रसिद्ध असे ड्रायफ्रूट, शिलाजीत, केसर यांची उत्पत्ति कशाप्रकारे करण्यात येते याबाबत देखील माहिती घेतली. यावेळी कुफरी व नालगौन्डा याठिकाणी घोड्यांची सफारी, याक सफारी, ऍपल गार्डन यांची पाहणी करण्यात आली तर मनाली येथे सोलन वॅले याठिकाणी रोप वे तसेच अडव्हेंचर करून सर्व सदस्यांनी आनंद घेतला. हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष, अभ्यास दौरा अध्यक्ष व सल्लागार यांच्या जोडीने कार्याध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस रवींद्र गायकवाड, खजिनदार हरीश साठे ,सहखजिनदार अनिल कुरघोडे, सहचिटणीस सुधीर पाटील, मंदार दोंदे, विवेक पाटील, माजी अध्यक्ष निलेश सोनावणे, भालचंद्र जुमलेदार, मयूर तांबडे, दीपक महाडिक, वचन गायकवाड, दीपक घोसाळकर, ओमकार महाडिक आदींनी मेहनत घेतली.
अध्यक्ष केवल महाडिक यांनी यापूर्वी देखील यशस्वीपणे राजस्थान आणि हैदराबाद या ठिकाणी अभ्यास दौरा आयोजित करून पत्रकारांना दोन राज्यांतील पत्रकारिते बाबत महत्वपूर्ण माहिती मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या धडाडी पूर्ण कार्यपद्धतीवर व परिपूर्ण नियोजनावर समितीतील प्रत्येक सदस्याचा विश्वास असल्याने शिमला-कुलू-मनाली अभ्यास दौरा देखील यशस्वी करून दाखवला. या अभ्यासदौऱ्यात तब्बल 23 सदस्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता सर्वांच्या या सहकार्याबद्दल अभ्यास दौरा अध्यक्ष केवल महाडिक यांनी सदस्यांचे व विशेषतः कोर कमिटीचे आभार व्यक्त केले.