पनवेल महानगरपालिका अंतर्गत शहरी व ग्रामीण परिसरातील आगामी सार्वजनिक कामांची गुणवत्ता तपासणीसाठी समिती स्थापन करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल दि. 27 (वार्ताहर):पनवेल महानगरपालिका अंतर्गत शहरी व ग्रामीण परिसरातील आगामी सार्वजनिक कामांची गुणवत्ता तपासणीसाठी समिती स्थापन करण्याची मागणी शिवसेनासंघटक पनवेल तालुका भरत पाटील यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. या निवेदनात भरत पाटील यांनी म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील गावांचा विकास करताना, महानगरपालिका अस्तित्वात आल्यापासून आजपर्यत ग्रामीण परिसरात पूर्णतः दुर्लक्षित करण्यांत आलेले होते व आहे पनवेल महानगरपालिकेने आजपर्यंत नागरी व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीकोनातून साफसफाईचे काम खाजगी ठेकेदारांच्या मार्फत महानगरपालिका हददीत सुरू केलेले आहे . मात्र महानगरपालिका ग्रामीण हददीत नागरी व आरोग्य विषयी कोणत्याही प्रकारची यंत्रना कार्यन्वीत नाही पनवेल महानगरपालिका हददीत ग्रामीण भागात स्वच्छता, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक शौचालय, शुध्द नळपाणीपुरवठा, अनियमित विद्युत पुरवठा, रस्ते, मलनिस्सारण, नाळे, गटारे अशा अनेक समस्या आहेत.सध्या महानगरपालिका क्षेत्रात व परिसरातील ग्रामीण भागात विविध प्रकारच्या कामांची निविदा काढण्यात येणार आहेत, असे खात्रीलायकरित्या समजते तसेच यापूर्वी महानगरपालिकेने केलेली कामे व त्यांची गुणवत्ता यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची शहरी व ग्रामीण जनतेची लोकभावना आहे. अंदाजपत्रकानुसार कमी मुर्त्यांकनाची निविदा मंजूर करून गुणवत्तेनुसार दर्जेदार कामे होतात कशी ? याबाबत सुध्दा जनतेच्या मनात संशय असून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. शासकीय नियम व अटी नुसार दर्जेदार काम करून घेण्यांची प्रामुख्याने जबाबदारी प्रशासनाची आहे.त्याबददल विद्यमान नगरसेवक अवाक्षरही काढण्यास तयार नाहीत त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या कामांत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना मलिंदा मिळत असावा म्हणून सर्व काही आलबेल अशी जनतेची भावना आहे. सर्वसाधारण अनुभव असा आहे की पनवेल महानगरपालिका अस्तित्वात येण्यांपूर्वी पंचायत समिती , जिल्हापरिषद व ग्रामपंचायतीने फंड ग्रामीण भागात विकास कामांसाठी वापरलेला आहे परंतु ती विकास कामे करताना त्या कामांच्या दर्जाबाबत गुणवत्ता तपासण्यांसाठी कोणतीही यंत्रना अस्तित्वात नव्हती व नाही त्यामुळे ती सर्व कामे तकलादू झालेली आहेत महानगरपालिका हददीतील समाविष्ट असलेल्या गावातील विकास करताना सार्वजनिक कामांचा दर्जा कसा राहील याबाबत महानगरपालिकेने एक गुणवत्ता समिती स्थापन महानगरपालिकेच्या शहरी व ग्रामीण भागातील पूर्वी झालेल्या कामांचा अभ्यास करून अपेक्षित अहवाल मागविण्यांची पध्दत अवलंबविण्यात यावी , जेणेकरून महानगरपालिका क्षेत्रातील कामांची गुणवत्ता व आगामी निधीचा वापर व्यवस्थित होईल अशी जनतेची धारणा आहे. महानगरपालिकेने कामांची गुणवत्ता तपासणीसाठी कमिटी स्थापन करताना त्या क्षेत्रातील तज्ञ मंडळीचा समावेश करावा जेणेकरून भविष्यात तीच तीच कामे वारंवार करणे योग्य होणार नाहीत याबाबत महानगरपालिकेने सार्वजनिक सभेचे आयोजन करून तमाम जनतेला प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेस माहिती दयावी , पनवेल महानगरपालिका हददीतील काही भागात सिडकोचे प्राबल्य असल्यामुळे दोन नागरी संस्थामध्ये नेहमी संघर्षाची ठिणगी पडत असते त्यामध्ये समन्वय साधून मार्ग काढण्याची गरज आहे परंतु ग्रामीण भागातील महानगरपालिका व नैना क्षेत्रात सिडको तर्फे नागरी सुविधांचा बोलबाला असलेली ग्रामीण जनता अक्षरश: भिक नको पण कुत्रे आवर’ अशा आवस्थेत आहे . प्रस्तुत प्रकरणी सखोल चर्चा करण्यासाठी आपण आम्हाला बोलवावे जेणे करून आमच्या शिवसेना संघटनेला सामाजिक समस्येची तड लावणे शक्य होईल असेही भरत बुधाजी पाटील यांनी म्हटले आहे.