मनसे विद्यार्थी सेने पनवेल शहर पदी श्री.आकाश दलाल यांची नियुक्ती.
वार्ताहर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष श्री आदित्य शिरोडकर साहेब यांचा हस्ते आकाश दलाल यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पनवेल शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.
पनवेल शहरात तिल आकाश दलाल यांच्या नियुक्ती ने मनसे च्या विद्यार्थी सेनेत मार्फत न्याय देण्याचे काम या पुढे आजून जोमाने होईल.सामाजिक व मनसेच्या सर्व कार्यक्रमात आकाश दलाल हे नेहमी अग्रगण्य असतात त्याचे काम करण्याची पद्धत पाहून त्यांना २६ जानेवारी रोजी रक्तदान कार्यक्रमात या सचिव पदाची नियुक्ती पत्र देऊन नियुक्त करण्यात आली.
ह्यावेळी मनविसे जिल्हाध्यक्ष अक्षय कशिद व रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत आदी सह शेकडो मनसे सैनिक उपस्थित होते.