ट्रेलरची स्कुटी गाडीस धडक; दोघे जखमी
पनवेल दि.२८ (वार्ताहर)- भरधाव ट्रेलरवरील चालकाने पुढे जाणाऱ्या स्कुटी या दुचाकी वाहनास पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्कुटी गाडीवरील दोघे जण जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील टि-पॉईंट येथील उड्डाणपूलाखाली घडली आहे. सचिन जाधव (वय-31) हे स्कुटीवरून आपल्या नातेवाईक यांना घेऊन जात असताना त्यांना अचानकपणे पाठीमागून आलेल्या ट्रेलरने धडक दिल्याने ते स्वतः व त्यांचे नातेवाईक खाली पडून जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अपघाताची खबर न देता ट्रेलरचालक पळून गेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.