दुसऱ्या व्यक्तीच्या पेटीएम अकाऊंटवरून 60 हजार रूपये फसवून स्वतःच्या खात्यात वळते करणारा आरोपी गजाआड
पनवेल दि.29 (संजय कदम)- माझ्या मोबाईलचा बॅलन्स संपलाआहे असे सांगून फिर्यादी यांचा मोबाईल घेऊन फिर्यादी यांचे पेटीएम अकाउंट वरून स्वतःचे अकाउंट वर 60 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करणाऱ्या आरोपीस पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने पुणे येथून अटक केली आहे. फिर्यादी संजय छेडीलाल रावत याचा मोबाईल आरोपी विजय राकेश सिंग, वय २५ वर्ष, रा. सुरतपूर गाव , जि. अलिगड, दिल्ली याने बॅलन्स सम्पला घेऊन फिर्यादी यांची फसवणूक केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. याबाबतची तक्रारपनवेल शहर पोलिस ठाण्यात करताच परीनंडळचे २. पनवेल शिवराज पाटील, सपोआ नितीन भोसले-पाटील पनवेल विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि गुन्हे संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कोरडे, पो उप निरी सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, पोना परेश म्हात्रे, पोशि सुनिल गर्दनमारे, पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत, पोशी विवेक पारासूर यांनी पुणे येथील वाघोली गाव येथे तांत्रिक तपास व गोपनिय बातमीदाराद्वारे सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.