मा.कोकण म्हाडा सभापती सन्मा.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शासकीय योजनांन साठी कार्ड बनवायच्या तीन दिवसीय शिबाराचे उदघाटन
पनवेल/प्रतिनिधी: मा.कोकण म्हाडा सभापती सन्मा.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते कार्यसम्राट नगरसेविका सौ.संजना समीर कदम यांच्या शासकीय योजनांन साठी कार्ड बनवायच्या तीन दिवसीय शिबाराचे उदघाटन.
पनवेल महानगरपालिकेच्या कार्यसम्राट नगरसेविका सौ.संजना समीर कदम आणि भाजपा रायगड जिल्हा युवा मोर्चा मा.सरचिटणीस समीर कदम यांच्या पुढाकाराने खारघर प्रभाग क्रमांक ६ मध्ये
शासकिय योजनांच्या लाभासाठी कार्ड बनविण्याच्या तीन दिवसीय शिबीराचे ऊद्घाटन कोकण म्हाडाचे मा.सभापती सन्माननिय बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या शिबीरामध्ये महात्मा फुले आरोग्य विमा योजना,नवीन पॕन कार्ड,पॕन कार्ड दुरूस्ती,जेष्ठ नागरिक ओळखपत्र,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,आयुष्मान भारत योजना,प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना,प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान अशा योजनांची माहिती आणि लाभासाठीचे कार्ड बनवून देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना कोकण म्हाडाचे मा.अध्यक्ष सन्माननिय बाळासाहेब पाटील म्हणाले की,पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी हे देशाला मीळालेलं नवरत्न आहे.गेल्या ७ वर्षांत त्यांनी कामांचा आणि योजनांचा डोंगर उभा केला आहे.या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यातील दुवा म्हणून नगरसेविका सौ.संजना कदम आणि श्री.समीर कदम व असेच भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्ते तसेच पनवेल महानगरपालिकेतील भाजपाचे नगरसेवक काम करीत आहेत.मी अशा लोकांचे कौतुक करतो,जे तळातील लोकांचा विचार करून पक्षाच्या विचारधारेनुसार जनसेवेचा वसा जोपासतात.संजना आणि समीर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याला माझा नेहमीच पाठींबा आसेल.
शिबीराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सौ.संजना कदम म्हणाल्या की,माझे पती भाजपाचे पदाधिकारी समीर कदम हे नेहमी जनसेवेला महत्त्व देतात.माझ्या प्रभागातील जनतेच्या सेवेसाठी जे-जे करावे लागेल त्यामध्ये मी माझ्या पतीसोबत राहून जनसेवा करीन.तसेच या शिबीराचा प्रभागातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाजपा रायगड जिल्हा मा. युवा मोर्चा सरचिटणीस समीर कदम यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये सांगीतले की,सामान्य जनतेच्या हिताचे उपक्रम राबविण्यात आम्ही कोठेही कमी पडणार नाही.सामान्य जनतेला केंद्रस्थानी माणून भाजपा कार्यकर्ते काम करीत असतात.आणि आज जनतेच्या गरजांचा योग्य विचार करूनच आम्ही या शिबीराचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा.