पनवेलकरांचा अभिमान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांना कोरोना योद्धा पुरस्काराने करण्यात आले सन्मानित.
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल परिसरात कोरोना काळामध्ये गोर – गरीब जनतेची मनापासून सेवा करणारे व समाजसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांनी कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता केलेल्या कामाची दखल घेऊन तसेच सर्वसामान्य गरीब गरजूंची काळजी करणाऱ्या व त्यांना जीवनाश्यक वस्तू तसेच मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिक अल्बम गोळ्याचे वाटप व असंख्य लोकांना अन्नदान केले. यासाठी केवल महाडिक यांना युवानेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक २०२१ क्रिकेटच्या सामन्यांमध्ये माणसातला देव माणूस पनवेलकरांचा अभिमान लोकनेते मा. श्री. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पनवेल परिसरात कार्य करणाऱ्या डॉ. गिरीश गुणे, डॉ. अमितकुमार दवे, सुशांत मोहिते, राज निंबार्गी, संदीप शेळके, भावेश शिंदे, संतोष ढगे, डॉ. रेहाना मुजावर, सुप्रिया सावंत, सुजाता गडगे, कांचन कदम, पत्रकार संजय कदम, पप्पू भट, माजी नगरसेविका नीता माळी यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक अनिल भगत, राजुशेठ सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक अच्युत मनोरे यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
