बेकायदेशीररित्या डेब्रीज टाकणाऱ्या डंपरविरूद्ध कारवाई
पनवेल दि. 31 (वार्ताहर): बेकायदेशीररित्या पळस्पे-जेएनपीटी हायवेलगच पुष्पकनगर परिसरात डेब्रिज टाकणाऱ्या डंपरविरूद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
या परिसरात डंपरच्या सहाय्याने मुंबई मेट्रो यार्डातील हजार्ड्स डेब्रिज सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे टाकून शासनाने कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पारीत केलेल्या विविध आदेशांचे हे डंपर उल्लघंन करून त्याद्वारे रोग प्रसार करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धडक कारवाई करीत मोठ्या प्रमाणात हे डंपर ताब्यात घेऊन चालकांविरूद्ध भादंवि कलम 269, 270, 278, 188, 109 सह आपत्ती व्यवस्थापन 2005 चे 51 (ब) सह साथीचे रोग अधि. 1857 कलम 3 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.