शिवसेना पनवेल तर्फे मा. बाळासाहेब ठाकरे जन्मदिनी फलकांचे अनावरण…उपशहरप्रमुख राहुल गोगटे यांचा पुढाकार..
पनवेल /प्रतिनिधी : शिवसेना पनवेलच्या वतीने मा.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पनवेल मध्ये विविध ठिकाणी फलकांचे अनावरण रायगड जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला व जेष्ठांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवसेनेच्या स्थापनेपासून ८०% समाजकारण व २०% राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे शिवसैनिक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतात, पूर्वीपासून फलक संस्कृती हा शिवसेनेचा आत्माच आहे, त्याच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक,लोक जागृती, अनेकांचे विविध स्तरावरील प्रश्न, माहिती, याद्वारे तळागाळातील लोकांपर्यत पोहोचण्याचे काम फलकाद्वारे होत असे व ते आजही होत आहे,त्याचाच एक भाग म्हणून यावेळी सेना प्रमुखांना आदरांजली म्हणून महात्मा फुले रोड, लाईन आळी शिवसेना शाखा, शिवाजी रोड जुने पोलीस स्टेशन अशा विविध ठिकाणी फलकांचे (ब्लॅक बोर्ड) अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील,शिरीष बुटाला, महानगर प्रमुख रामदास शेवाळे,महानगर संघटक प्रथमेश सोमण, दिपक घरत, अच्युत मनोरे, प्रविण जाधव, राहुल गोगटे, अतुल पलण, राजा भगत, राकेश टेमघरे,संकेत बुटाला, अमर पटवर्धन, प्रसाद पटवर्धन, दत्ता फडके,सतीश कळमकर, प्रदीप मखिजा, प्रसाद सोनवणे, शिर्के, जयेश परब आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.