नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नामुळे स्पीड ब्रेकरला मारण्यात आले पट्टे
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या स्पीड ब्रेकरमुळे वारंवार अपघात घडत होते अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे मारुन वाहन चालकांना दिलासा दिला आहे.
शहरातील उरण नाका रोड एमसीबी कार्यालयाजवळ स्पीड ब्रेकर आहे तिथे नेहमीच अपघात होत होते. या संदर्भात काही नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी यांना ही बाब सांगितली असता त्यांनी तातडीने सदर ठिकाणी जावून खाजगी माणसे लावून संपूर्ण स्पीड ब्रेकरला पट्टे मारुन घेतले आहे. त्यामुळे सदर स्पीड ब्रेकर हा वाहन चालकांना व्यवस्थित दिसत असून त्यामुळे अपघात टळू लागले आहेत. याबद्दल वाहन चालकांनी नगरसेवक राजू सोनी यांचे आभार मानले आहेत.
