ओमकार महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोशिएशनतर्फे वृद्धाश्रमात ब्लॅंकेट, फळे व बिस्कीट वाटप.
पनवेल / प्रतिनिधी : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे युवा सदस्य व पत्रकार मित्र असोशिएशनचे सदस्य कु.ओमकार महाडिक यांचा वाढदिवस आदई येथील अमनदीप वृद्धाश्रम येथे जेष्ठ नागरिकांच्या सोबतिने साजरा करण्यात आला. वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिकांसोबत ओमकार महाडिक यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांनीओमकार महाडिक यांना शुभाशीर्वाद दिले. यावेळी श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पत्रकार मित्र असोशिएशन यांच्यावतीने वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट वाटप तसेच फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी पत्रकार मित्र असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राजे प्रतिष्ठान कामगार सेना महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव, कोकण संध्या वृत्तपत्राचे संपादक दिपक महाडिक, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, सदाशिव मोरे, विजय शिंदे, निखिल भोईर यांच्यासह वृद्धाश्रम संस्थापक व चालक वर्ग उपस्थित होता.