नवीन पनवेल सीकेटीत वाजली शाळेची घंटा
पनवेल/प्रतिनिधी: कोविड काळात बंद असलेल्या शाळा शिरू करण्याच्या शासनच्या निर्णयानुसार २०२०-२१ शैक्षणिक वर्षात पहिल्यांदा सी. के. ठाकूर विध्यालय,इंग्रजी माध्यमात सकाळी ठीक ८ वाजता घंटा वाजली. शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ विद्यार्थ्यांचे टेंपरेचर चेक केले गेले. सामाजिक अंतराचे काटेकोर पालन करत दोन वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला. सौ पूर्वा खेडकर,श्री मनोज मातंग,सौ वर्षा वारे,सौ मनीषा नारखेडे, श्री भरत जितेकर,श्री प्रसाद जोशी,श्री महेश पोपटा, श्री प्रकाश रिसबूड या शिक्षकांनी निमेश मात्रे,राम जितेकर,विशाल पाटील,जितेंद्र माळी, संतोष घाटे या कर्मचाऱ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांची स्वच्छता व शिस्तीचे व्यवस्थित पालन केले, 1 फेब्रुवारी रोजी इयत्ता नववी ते दहावी ची शाळा सुरू झाली. राष्ट्रगीत आणि प्रार्थनेने दिन क्रमांकाची सुरुवात झाली. सौ. गायत्री कोटीयन,सौ.उज्वला सिमरिया, सौ.शशिकला पाटील, सौ.स्वाती काळे, सौ.मनुष्या भगत श्री.प्रकाश पांढरे या वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत केले. एकूण 37.68% विद्यार्थ्यांनी शाळेत हजर होण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला होता प्रत्यक्षात 35.47% विद्यार्थी शाळेत हजर होते अनेक महिन्यांनी विद्यालयात प्रवेश केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. मुख्याध्यापक श्री.संतोष चव्हाण व पर्यवेक्षिका सौ.नीरजा अधुरी यांचे उत्कृष्ट नियोजन आणि नियमाचे काटेकोर पालन याबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.थोड्याच दिवसात इतर वर्गही सुरू होतील असा विश्वास मुख्याध्यापक श्री.संतोष चव्हाण यांनी व्यक्त केला.
संस्थेचे चेअरमन माननीय श्री.रामशेठ ठाकूर, माननीय आमदार श्री.प्रशांत ठाकूर अध्यक्ष माननीय श्री.अरुण शेठ भगत,व्हाईस चेअरमन माननीय श्री.वाय.टी देशमुख,सचिव मा. डॉ. एस. टी गडदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण सर,पर्यवेशिक, मार्गदर्शक शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.