शिवसेना पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांचे करण्यात आले ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अभिनंदन
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल महानगर प्रमुख शिवसेना पक्षाचे रामदास शेवाळे यांची बिमा कॉम्प्लेक्स कळंबोली येथे त्यांच्या कार्यालयात जाऊन जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकार्यांनी भेट घेवून त्यांचे नुकतेच दैनिक सकाळ वृत्त समुहाकडून कोविड कोरोना योद्धा सन्मान करण्यात आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
नुकताच रामदास शेवाळे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत सन्मान कोविड कोरोना योध्दा म्हणून पुरस्कार दिला होता. त्याबद्दल जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सोपानं भंडारे, उपाध्यक्ष, राशिद पठाण, पी एस हातेकर, सहसचिव किसन कदम खजिनदार , अंकुश पाटील, विनायक शिवलकर , मनोहर माने, धनराज विसपुते यांनी त्याची भेट घेवुनत्याना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व त्याच्या पुढील कार्याच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.