2 लाख 90 हजार रुपये किंमतीचे लोखंडी चॅनेल चोरणार्या आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः शहरातील लेबर कॅम्प विरुपाक्ष हॉलच्या बाजूला पनवेल येथे चालू असलेल्या काँक्रीट रोडच्या कामाच्या ठिकाणावरून 2 लाख 90,000/-रुपये किमतीचे 14 लोखंडी चॅनेल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तीन आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
सदर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमी दारा मार्फत माहिती प्राप्त करून करून आरोपी नामे हरुण लाला सय्यद वय 24 वर्षे, इब्राहिम साहेब शेख वय 30 वर्ष दोन्ही राहणार नवनाथ नगर झोपडपट्टी पनवेल यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन त्यांच्या कडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करता त्यांनी चोरी केलेले लोखंडी चॅनेल आरोपीत नामे दीलशेर शाहा मोहम्मद खान, वय 35 वर्ष रा.उसरली खुर्द पनवेल यास दिले असल्याचे सांगून कबुली दिली. आरोपी नामे दिल शेर शहा मोहम्मद खान यास विचुंबे, पनवेल येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास करता त्याने वरील आरोपित यांच्या कडून चोरीचे लोखंडी चॅनेल विकत घेतल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चोरीस गेलेला 100% मुद्देमालासह गुन्हा करण्यासाठी वापरलेली वाहने टेम्पो व रिक्षा खालील प्रमाणे हस्तगत करण्यात आली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पो उप आ, परी 2. पनवेल. शिवराजपाटील, सपोआ, नितीन भोसले-पाटील पनवेल विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि गुन्हे संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली पो उप निरी सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, पोना परेश म्हात्रे , पोशि सुनिल गर्दनमारे ,पोशी यादवराव घुले, पोना युवराज राऊत ,पोशी विवेक पारासूर यांनी सदरची कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनिरी सुनिल तारमळे करीत आहेत.
