दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० व्या वाढदिवसानिमित्त राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे ७० सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन.
पनवेल / प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील दानशूर नेतृत्व व पनवेलकरांची शान म्हणून ज्यांची ख्याती आहे तसेच समाजातील गोर – गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि सगळा समाज आपला कुटुंब आहे,असे मानून नेहमी मदतीचा हात देणारे दानशूर व्यक्तीमत्व, माणसातील देव माणूस व पनवेलकरांचा अभिमान माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा २ जून २०२१ रोजी ७० वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. यावर्षी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात ७० सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात शुक्रवार दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी गरीब वस्तीतील लहान मुलांना युनियन हॉटेल येथे संध्याकाळी ५.०० ते ७.०० दरम्यान मिसळ महोत्सव आयोजित करून सुरुवात. मंगळवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२१ रोजी चित्रकला स्पर्धांचे आयोजन. शुक्रवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ रोजी गरजू विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्यांचे वाटप. सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतूक पोलिसांचा सन्मान. बुधवार दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे वृद्धांना फळे बिस्कीट वाटप. शुक्रवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ रोजी स्नेहकुंज आधारगृह येथे जेष्ठांसमवेत पोवाडा कार्यक्रम. सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ रोजी रेल्वे स्थानक येथे भंडाऱ्याच्या माध्यमातून गोर – गरिबांना अन्नदान. गुरुवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी टॉवरवाडी येथे अन्नदान. रविवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ रोजी फणसवाडी येथे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे तसेच याचप्रमाणे मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये विविध ७० सामाजिक उपक्रम राबवून माणसातील देव माणूस आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. सदर उपक्रमाचे आयोजन – मा. श्री. केवल दीपक महाडिक (महाराष्ट्र सहचिटणीस राजे प्रतिष्ठान कामगार सेना तथा अध्यक्ष पत्रकार मित्र असोसिएशन) यांनी केले असून त्यांच्यासोबत मा. श्री. दिलीप मगर (उपाध्यक्ष पत्रकार मित्र असोसिएशन) मा. श्री. संतोष भगत (उपाध्यक्ष पत्रकार मित्र असोसिएशन) मा. श्री. ऍड. मनोहर सचदेव (सचिव पत्रकार मित्र असोसिएशन) मा. श्री. संजय नॊगजा ( प्रमुख सल्लागार पत्रकार मित्र असोसिएशन ) मा. श्री. रमणशेठ खुटले (सदस्य पत्रकार मित्र असोसिएशन) मा. श्री. दिपक महाडिक (सदस्य पत्रकार मित्र असोसिएशन) मा. श्री. ओमकार महाडिक (सदस्य पत्रकार मित्र असोसिएशन ) मा. श्री. संतोष आमले ( नवीन पनवेल अध्यक्ष राजे प्रतिष्ठान कामगार सेना ) मा. श्री. विजय दुन्द्रेकर ( नवीन पनवेल उपाध्यक्ष राजे प्रतिष्ठान कामगार सेना ) मा. श्री. सुरेश भोईर (नवीन पनवेल सचिव राजे प्रतिष्ठान कामगार सेना) मा. श्री. कैलास रक्ताटे (सदस्य पत्रकार मित्र असोसिएशन) हे विशेष मेहनत घेणार आहेत. या अनोख्या उपक्रमाचे पनवेलच्या जनतेने व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विशेष कौतुक केले आहे.
