पर्जन्ययाग संयोजन समिती पनवेलतर्फे पर्जन्ययागाचे आयोजन
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः येणार्या संवत्सरात पर्याप्त पर्जन्यमान व्हावे म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पर्जन्य यागाचे आयोजन पर्जन्ययाग संयोजन समिती पनवेलतर्फे करण्यात आले आहे.
यानिमित्त आजपासून श्री बल्लाळेश्वर मंदिर पनवेल येथे सर्वप्रायश्चित होम गो पूजन, गुरुवार 4 फेब्रु.रोजी सकाळी प्रधान संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापन, पर्जन्यमंत्र व ग्रह जप अग्नीस्थापना, सायंकाळी आरती मंत्र पुष्प, 5 फेब्रु. रोजी स्थापित देवता पूजन, पर्जन्यमंत्र, हवन, आरती, मंत्रपुष्प, 6 फेब्रु.रोजी स्थापित देवता पूजन, पर्जन्यमंत्र जप, हवन, श्री सत्य हनुमान पूजन, सायंकाळी आरती, अष्टावधान सेवा, मंत्रपुष्प, 7 फेब्रु.रोजी स्थापित देवता पूजन, पर्जन्यमंत्र जप, हवन, दिपोत्सव, आरती व 8 फेब्रु. रोजी स्थापित देवता पूजन, प्रायश्चित होम, बलिदान पुर्णाहृती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन वसंत करंदीकर व वैभव जोशी यांनी केले आहे.
