भाजप पालघर जिल्हा प्रभारी म्हणून संजय पवार यांची नियुक्ती
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि कामगार आघाडी चे प्रदेश अध्यक्ष गणेश भाऊ ताठे यांच्या आदेशाने व इतर प्रदेश कार्यकारणी च्या माध्यमातून आज संजय वा पवार यांची पालघर जिल्हा प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली.
संजय पवार यांनी स्वतः अध्यक्ष असलेल्या ऑल इंडिया सिफेरस अँड जनरल वर्कर्स युनियन च्या माध्यमातून हजारो कामगारांचे प्रश्न सोडवले आहेत , कोरोना च्या काळात विदेशात अडकलेल्या अनेक खलाशी कामगारांच्या साठी त्यांनी विदेशी मंत्रालयाकडे पाठपुरावा करून हजारो कामगाराना मायदेशी परत येण्यास मदत केली आहे , केंद्रीय शिपिंग मंत्री मनसुख मांडविया यांनी संजय पवार यांच्या कार्याची दखल घेऊन ट्विटरवर त्यांच्या कार्याची स्तुती देखील केली आहे.. याशिवाय मच्छीमार कामगार च्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवत कोकण किनारपट्टी च्या समुद्र मध्ये होणार्या ङएऊ फिशिंग ला आळा घालण्यासाठी पाठपुरावा केला त्याने अनेक अवैध बोटींच्या वर कार्यवाही करण्यात आली आहे , आता पर्यन्त च्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजप कडून त्यांना पालघर जिल्ह्याची विशेष प्रभारी देण्यात आली त्या बद्दल सर्व कामगार स्थरातून व सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांच्या कडून श्री पवार यांचे अभिनंदन केले जात आहे.