लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रमांची युनियन हॉटेल येथे आयोजित गरिबांसाठी मिसळ महोस्तवातून सुरुवात.
सभागृहनेते परेशजी ठाकूर यांची विशेष उपस्थिती. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या उपक्रमांचे कौतुक.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील दानशूर लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा येत्या २ जून २०२१ रोजी वाढदिवस असून त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र सहचिटणीस व पत्रकार मित्र असोशिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी ७० व्या वाढदिवसानिमित्त ७० सामाजिक उपक्रम करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार या उपक्रमांची सुरुवात आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२१ रोजी सभागृह नेते परेशजी ठाकूर यांच्या विशेष उपस्थितीत पनवेलमधील युनियन हॉटेल येथे गरीब – गरजू लहान मुलांना मिसळ महोस्तवातून करण्यात आली. यावेळी परेशजी ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि केवल महाडिक यांनी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्याप्रती असलेले प्रेम व आदर व जिव्हाळा यामुळे त्यांनी ७० सामाजिक कार्यक्रम राबविण्याची संकल्पना अतिशय उत्तम असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातील प्रसिद्ध मिसळ युनियन हॉटेल सुनिल खळदे यांची फेमस मिसळ गोर – गरीब लहान मुलांना खाऊ घालून करण्यात आली हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे त्यांच्या पुढील सर्व कार्यक्रमांना मी भरभरून शुभेच्छा देत आहोत असे देखील परेशजी ठाकूर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी यांचा वाढदिवस देखील परेशजी ठाकूर यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला व परेशजी ठाकूर यांनी प्रकाशभाई कोळी यांना शुभेच्छा दिल्या. सदर उपक्रमास राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब, कार्याध्यक्ष प्रकाशभाई कोळी, महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, सचिन लोखंडे, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, कोळखा पेठ अध्यक्ष आनंद सुरते, सदाशिव मोरे, सुनील वरेकर, सचिन स्वामी, विजय शिंदे, ओमकार महाडिक, पत्रकार प्रवीण मोहोकर, रवींद्र गायकवाड, सुमंत नलावडे व लक्ष्मण ठाकूर यांच्यासह पनवेल परिसरातील नागरिक उपस्थित होते. युनियन हॉटेलचे मालक सुनील खळदे यांनी याउपक्रमास विशेष सहकार्य केले.
