कळंबोली ते मानसरोवर एन एम टी सेवा पुन्हा सुरु
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेर्या वाढवणार
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांकरिता लोकल प्रवसास परवानगी मिळताच नवी मुंबई महापालिके मार्फत चळवण्यात येणारी कळंबोली ते मानसरोवर रेल्वे स्थानका दरम्यानची 56 नंबर ची बस सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आल्याने,कळंबोली आणि कामोठे परिसरातील रेल्वे प्रवाशांनी एन एम टी च्या या निर्णया बद्दल आनंद व्यक्त केला आहे.
कळंबोली तसेच कामोठे परिसरातून हार्बर रेल्वे मार्गावरून मुबंई परिसरात जाणार्या प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठणे सोईचे व्हावे या दृष्टीने एन एम टी तर्फे कळंबोली ते मानसरोवर रेल्वे स्थानका दरम्यान 56 नंबरची बस सेवा स्थानिक रिक्षा चालकांचा बस सेवेला झालेला मोठा विरोध झूगारून काही वर्षांपासून सुरु करण्यात आली आहे. एन एम एम टी च्या या बस सेवेचा फायदा कळंबोली सोबत कामोठे परिसरातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत असून, सुरवातीला केवळ काही फेर्यांपुरता मर्यादित असलेल्या या बस सेवेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने कालांतराने फेर्याच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय एन एम एम टी तर्फे घेण्यात आला होता. कोरोना संसर्ग काळात लोकल प्रवसा सोबतच इतर परिवहन सेवा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने स्थानिक रिक्षा चालकांच्या विरोधा नंतर देखील बंद न होऊ शकलेली एन एम एम टी ची 56 नंबर ची बस सेवा बंद ठेवण्यात आल्याने मागील 10 महिने बंद असलेली ही सेवा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जाऊ लागल्याने नुकतीच कळंबोली ते मानसरोवर दरम्यानची बस सेवा पुन्हा बहाल करण्यात आली असून, प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस फेर्यामध्ये वाढ केली जाणार असल्याची माहिती एन एम एम टी कर्मचार्यांनी दिली आहे.