कामोठे सेक्टर 21 पथदिव्यांनी उजळणार
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमधील अनेक विभागात पथदिवे नसल्याने तो भाग अंधारमय होता. या संदर्भात सिडकोकडे स्थानिक समाजसेवक सचिन गायकवाड यांनी पाठपुरावा केल्याने आता लवकरच हे पथदिवे उजळणार आहेत.
कामोठे वसाहतीच्या निर्मिती नंतर वसाहतीमधील अनेक विभाग हा अंधारातच आहेत. रत्यावर पथदिवे आहेत. मात्र दे बंद अवस्थेमध्ये आहे. त्या मुळे अनेक भाग हा अंधारात राहतो आहे. अश्याच पद्धतीने सेक्टर 21 मधील प्लॉट 43 व 43अ पथावर पथदिवे नव्हते, पथावर पथदिवे नसल्या करणामुळे ,रात्री अंधारातून या रत्यावरून आपला रस्ता येथील स्थानिकांनी शोधावा लागत होता. त्या मुळे या परिसरात पथदिवे लावण्यात यावे अशी मागणी समाजसेवक सचिन गायकवाड यांनी सिडकोकडे केली होती. त्या मागणी नुसार, या 500 मीटरच्या पाथवेवर लवकर पथदिवे बसवण्यात येणार आहे. अशी माहिती सिडको विभागा कडून देण्यात आली आहे. त्या मुळे हा पाथवे पथदिव्यांनी उजळून निघणार आहे.