मोबाईल टॉवरच्या उभारणीला पालिकेची स्थगिती ; रहिवाशांच्या विरोधा नंतर कामकाज थांबले
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः कामोठे सेक्टर 36 आणि सेक्टर 7 मधील शुभागण कॉम्प्लेक्स च्या समोरील डिव्हाईडर वर उभारण्यात येत असलेल्या मोबाईल टॉवर च्या बांधकामाला पनवेल महानगरपालिकेने स्थगिती दिली आहे. स्थानीक नगरसेवक आणि रहिवाशी यांच्या विरोधा नंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिका आणि सिडको च्या परवानगी नंतर, इडक मोबाईल टॉवर कंपनीने, कामोठे सेक्टर 36 आणि सेक्टर 7 मधील शुभागण कॉम्प्लेक्स समोरील डिव्हाईडर वर , मोबाईल टॉवर उभारणीसाठी बांधकाम युद्धपातळीवर सुरू होते. या मोबाईल टॉवर च्या उभारणी ची माहिती स्थानिक नगरसेवक विजय चिपळेकर आणि याच परिसरातील रहिवाशी सोसायट्या यांना मिळाल्या नंतर, या मोबाईल टॉवर च्या बांधकामाला रहिवाशी आणि सोसायट्यांनी विरोध दर्शविला आहे. या मोबाईल टॉवर मुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्या मध्ये शुभागण कॉम्प्लेक्स, नंदनवन पार्क सोसायटी आणि कृष्णा सोसायटी ने विरोध दर्शविला आहे. स्थानिक नगरसेवक विजय चिपळेकर आणि रहिवाशी यांनी यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी पत्र लिहून विरोध दर्शविल्या नंतर, नगर रचना विभागाने मोबाईल टॉवर कंपनीला परवानगी दिलेल्या पत्रातील अटीनुसार अट क्र 8 नुसार बांधकाम का रद्द करू नये या बाबत 7 दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्या मुळे या बांधकामाला पालिके स्थगिती देखील दिली होती, पालिकेच्या निर्णया नंतरच पुढील बांधकाम करण्यात येईल अशी माहिती पालिकेने दिली आहे. त्या मुळे पुन्हा या मोबाईल टॉवर च्या बांधकामाला ब्रेक लागला आहे.
चौकट
पालिकेने स्थानिक रहिवाशीयाच्या आरोग्याचा विचार करावा : नगरसेवक विजय चिपळेकर
कामोठे सेक्टर 7 मधील शुभागण कॉम्पलेक्स समोरील डिव्हाईडवर मोबाईल टॉवर चे बांधकाम सुरू आहे. पालिकेने या कामाला परवानगी देखील दिली आहे. मात्र या टॉवर ला स्थानिक 3 ते 4 सोसायट्यांनी लेखी विरोध केला आहे. या विरोधा सोबत पालिकेने येथील रहिवाशीयांच्या आरोग्याचा विचार करावा अशी मागणी नगरसेवक चिपळेकर यांनी केली आहे. आणि या टॉवर च्या बांधकाला हद्दपार करावे अशी मागणी चिपळेकर यांनी केली आहे.