अमली पदार्थ विरोधी कक्षाने गांजासह एका इसमाला घेतले ताब्यात
पनवेल दि.07 (वार्ताहर): पनवेल परिसरातून अमली पदार्थ विरोधी कक्षाने एका इसमाला गांजा जवळ बाळगल्यामुळे ताब्यात घेतले आहे.
अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वपोनि जयराज छापरिया यांना पनवेल परिसरात एक इसम गांजा हा अमली पदार्थ जवळ बाळगून असल्याची माहिती गुप्त बातमीदाराद्वारे मिळाल्याने सपोनि अश्विनी कुसूमकर, पोना महेंद्र अहिरे व त्यांच्या पथकाने शहरातील शनी मंदिराजवळ, टपालनाका परिसरात छापा टाकून आरोपी जावेद नजीर खान याला दोन किलो सत्तर ग्रॅम वजनाच्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवलेल्या सुट्ट्या पाने, फुले, काड्या सलग्न असा उग्र वासाचा गांजा ज्याची किंमत 37 हजार इतकी आहे ती ताब्यात घेतली आहे.