लॅपटॉपसह मोबाईल फोन व इतर ऐवज केला लंपास
पनवेल दि.07 (वार्ताहर):लॅपटॉपसह मोबाईल फोन, घड्याळ व इतर ऐवज असा मिळून जवळपास 40 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी राहत्या घरातून लंपास केल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे.
तुषार कांबळे (रा.-रिद्धी सिद्धि पॅरेडाईस, रू.-ए-001, से.-12) यांचे व त्यांच्या सोबत राहणारा मित्र शेखर पाणमंद यांच्या घराच्या हॉलमध्ये ठेवलेल्या लॅपटॉप, मोबाईल फोन, घड्याळ व इतर वस्तू कोणीतरी अज्ञात चोरट्याने लॅच खराब असलेल्या, कडी न लावलेला मॅगनेटने चिटकून बंद असलेल्या घराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश करून सदर माल चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार कामोठे पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.