19 वर्षीय तरुणीवर करण्यात आला सामुहिक बलात्कार
पनवेल, दि.8 (वार्ताहर) ः शितपेयातून मद्य पाजून दोघा तरुणांनी 19 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
खारघर वसाहतीमधील सेक्टर 12 येथील एका 19 वर्षीय तरुणीची बस चालकाशी ओळख झाली होती. सदर बस चालकाने व त्याच्या मित्राने या तरुणीला बोलावून शितपेयातून दारु पाजली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिला सेक्टर 18 मधील संजीवनी शाळेसमोरील रस्त्यावर फेकून ते पसार झाले होते. दरम्यान सदर तरुणी घरी न आल्याने तिचे कुटुंबिय शोध घेत असताना ती त्यांना सदर ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. याबाबत त्वरित खारघर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेवून तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. तरुणी शुद्धीवर आल्यावर तिने घडलेला प्रकार खारघर पोलिसांना सांगितला आहे. या प्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.