तळोजा परिसरातील नविन केमिकल झोनमध्ये अग्नी तांडव
चार कंपन्यांना लागली आग एजिओक्रीस्ट ऑगनाईज लि , स्टॅन्डी पॅक ऑईल प्रा. लि., गौरी अॅसिड व शारदा फेब्रिकेशन प्रा. लि.या चार कंपन्यांना लागल
तळोजा/प्रतिनिधी:तळोजा एम. आय. डी. सी. च्या परिसरातील पडघे येथील नविन केमिकल झोनमध्ये आज दिनांक 9 फेब्रुवारी सकाळी 11वाजताच्या सुमारास एजिओक्रीस्ट प्लाॅट. नं. 34 या कंपनीला अचानक आग लागली. या आगीने भीषण रूप धारण केला असून एजिओक्रीस्ट या कंपनीच्या शेजारी असलेली स्टॅन्डी पॅक ऑईल प्रा लि. प्लाॅट नं. 33 व गौरी अॅसिड प्लाॅट. नं.32, शारदा फेब्रिकेशन प्रा. लि. प्लाॅट. नं. 35 या तीन कंपन्यांनी सुद्धा पेट घेतला असून या तीन कंपन्यासुद्धा जळून खाक झाल्या आहेत.एकूण चार कंपन्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीत ऑईल चे ड्रम असल्यामुळे या आगीत मोठे स्फोट होत आहेत. . स्फोटांमुळे आगीने तांडव रूप धारण केलेले दिसून आले आहे.सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे चर्चा चालू असून या आगीमध्ये एकूण चार ही कंपन्यां जळून खाक झाल्या असून कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे बोले जात आहे.
घटनास्थळी आग विजविण्यासाठी तळोजा अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करीत असून त्याच्या मदतीला पनवेल अग्निशामक दल, दिपक फरटिलायझर कंपनीच्या अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पोचल्या असून आग विझविण्याचे काम करीत आहेत. तब्बल पाच तास झाले तरी आग अजून आटोक्यात आली नसल्याचे तसेच जिवित हानी संबंधी माहिती आग विजल्यानंतर पाहणी केल्या शिवाय देता येणार नाही. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.असे तळोजा विभागीय फॅक्टरी ऑफीसर अजित मोहिते यांनी दिली.एकूण चार कंपन्या आहेत एजिओक्रीस्ट ऑगनाईज प्रा. लि. प्लाॅट नं. 34
स्टॅन्डी पॅक ऑईल प्रा. लि. प्लाॅट नं. 33
गौरी अॅसिड प्रा. लि. प्लाॅट नं 32
शारदा फेब्रिकेशन प्रा. लि. प्लाॅट न. 35