तब्बल 29 तासानंतर आग विझविण्यास अग्निशामक दलाच्या जवानांना यश*
स्टॅन्डी पॅक ऑईल कंपनीची आग अजून धूमधूमते
पनवेल(वार्ताहर):
तळोजा औधोगिक परिसरातील पडघे येथील नविन केमिकल झोनमध्ये मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11वाजताच्या सुमारास अचनाकपणे एजिओक्रीस्ट ऑगनाईज प्लाॅट. नं. 34 या कंपनीला आग लागली होती. या कंपनीला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीची झळ शेजारी असलेल्या स्टॅन्डी पॅक ऑईल कंपनी प्लाॅट नं 33, गौरी अॅसिड प्रा. लि. प्लाॅट. नं. 32, व शारदा फेब्रिकेशन प्रा लि प्लाॅट. नं. 35 या कंपन्यांना लागताच या चार हि कंपन्यांनी पेट घेतला. या चार हि कंपन्यांनी अग्नी तांडव केला. मंगळवारी दिनांक 9 फेब्रुवारी सकाळी 11वाजता लागलेली आग बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी दूपारी 3.30 वाजेपर्यंत पेटत होती. सायंकाळी 4 वाजता अग्निशामक दलाच्या जवानांना हि विझविण्यास यश आले. तब्बल 29 तासानंतर आग पूण॔पणे आटोक्यात येवून ती विझविण्यास यशस्वी झालो असल्याचे कबुली तळोजा अग्निशामक दलाचे अधिकारी आर. एन. फरांडे यांनी दिली
या मोहिमेत तळोजा अग्निशामक दल, नवी मुंबई अग्निशामक दल, रबाले एम.आय.डी.सी अग्निशामक दल, खारघर अग्निशामक दल, कळंबोली अग्निशामक दल, न्यू. पनवेल व पनवेल अग्निशामक दल, अबंरनाथ एम.आय.डी.सी. अग्निशामक दल, व दिपक फरटिलायझर कंपनीचे अग्निशामक दल अशा एकूण 15 अग्निशामक गाड्या घटनास्थळी उपस्थित होत्या. तसेच आग विझविण्यासाठी 60अग्निशामक दलाचे जवानांनी सहभाग दश॔विला होता. तब्बल 29 तासानंतर हा अग्नि तांडव विझविण्यासाठी सव॔ अग्निशामक दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले.
आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रथम दश॔नी या चार हि कंपन्यांमध्ये फक्त छोटे अग्निशामक चे बाॅटल दिसून आले आहेत. तसेच इतर कोणतीही उपाययोजना आढळून आल्या नाहित. पुढील तपास केल्यानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होतील. या कंपनीच्या इमारतीचे स्टक्चर ऑडीट केले आहे कि नाही हे पुढील तपासात स्पष्ट होईल. अशी वरील सव॔ माहिती तळोजा अग्निशामक दलाचे अधिकारी आर.एन. फरांन्डे यांनी दिली आहे.
या आगीमध्ये एजिओक्रीस्ट ऑगनाईज व स्टॅन्डी पॅक ऑईल या दोन कंपन्या पूण॔ पणे 100% जळून गेल्या आहेत. गौरीअॅसिड हि कंपनी 40% जळाली असून शारदा फेब्रिकेशन हि कंपनी 25% जळाली असून या दोन कंपन्या पूण॔पणे जळण्यापासून विचविण्यास यश आले आहे.
एजिओक्रीस्ट या कंपनीची पूण॔ इमारत 100% कोसळली आहे. तर स्टॅन्डी पॅक ऑईल कंपनीची इमारत पूण॔ पणे 70% जळून खाली कोसळली आहे. उर्वरित 30% इमारतीचा भाग पूण॔ जळून खाक झाला असून तो ही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनीतील आतील भागात जे ऑईलचे ड्रम आहेत त्यावरच हि इमारत कोसळली असल्याने त्या ड्रम पर्यत पाणी पोचत नसल्या कारणाने आग अजून पर्यत धूमधूमत आहे अशी माहिती तळोजा अग्निशामक दलाचे वरिष्ठ अधिकारी दिपक डोरगुडे यांनी दिली आहे.