पालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी ; 105 पदे रिक्त
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः कोविड मध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या परिस्थितीमुळे यावर्षी अर्थसंकल्पात सरकारने आरोग्यावर फोकस केला आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात देखील सहा नागरी प्राथमिक केंद्रांचा समावेश आहे.पालिकेच्या स्थापनेला 4 वर्षाचा कार्यकाळ लोटला तरी देखील अद्याप याठिकाणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाढा अपुर्या कर्मचार्यांवर लागत आहे.
पालिका क्षेत्रात कोविड रुग्णांचा 30 हजारांचा पल्ला गाठला आहे. कोविड काळात या आरोग्य केंद्रांचा वापर अँटीजेन चाचण्या तसे च लहान आजारांवर औषधोपचारासाठी मोठ्या प्रमाणात करण्यात आला.इतर वेळा देखील सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्राचा वापर करीत असतात. मात्र सध्याच्या घडीला हे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारीच असल्याचे दिसून हयेत आहेत. पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा तब्बल 105 पदे रिक्त असून केवळ 80 कर्मचार्यांच्या आधारावर या आरोग्य केंद्राचे काम सुरु आहे. एकीकडे पालिकेच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे.अपुर्या कर्मचार्यांमुळे इतर कर्मचार्यांमुळे कामाचा बोजा पडत आहे. लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची गरज आहे, यापूर्वी यापैकी काही आरोग्य केंद्र सिडकोच्या ताब्यात होती. वर्षभरापूर्वीच या आरोग्य केंद्राचे हस्तांतरण पालिकेकडे झाले आहे.
चौकट –
जिल्ह्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -6
एकूण कर्मचारी -185
रिक्त -105
डॉक्टरांची देखील कमतरता –
7 डॉक्टरांची आवश्यकता असताना सध्याच्या घडीला केवळ 3 डॉक्टर पालिकेत कार्यरत आहेत. 6 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी या 3 डॉक्टरांवर आहे. अद्यापही 4 डॉक्टरांची आवश्यकता असताना पदे मंजुर असताना देखील 4 डॉक्टरांची पदे अद्यापही रिक्तच आहेत.विशेष म्हणजे 105 रिक्त पदांमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आरोग्य विभागाला अडचण निर्माण होत असून इतर कर्मचा-यावर हा भर पडत आहे.
आरोग्य अधिकार्यांचा कोटा –
उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई , ठाणे मंडळ यांच्या माध्यमातुन रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्याने या रिक्त जागा भरल्या जातील. – डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी , पनवेल महानगरपालिका )