पोलिस पाटलांना कोविड यौद्धा पुरस्कार ;तालुका पोलिस ठाण्याचा उपक्रम
पनवेल, दि.10 (वार्ताहर) ः करोनाच्या काळात गावपातळीवर उत्तम कामगिरी बजावत प्रशासनाला सहकार्य करणार्या पोलीस पाटलांना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन गौरविण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोना काळात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यापासुन तेथील देखरेख यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती, श्री कृष्णा जन्माष्टमी, ईद, रामनवमी, रमजान ईद, गणेशोत्सव, मोहरम, नवरात्र आदी सणात सामाजिक सलोखा राखुन मेहनत घेतल्याने पोलीस पाटलांना सन्मानित करण्यात आले. पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्याहस्ते या पोलीस पाटलांना सन्मानित करण्यात आले. वाकडी गावातील स्वप्ननगरी रिसॉर्ट येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोविड योध्दा पुरस्कार सोबतच परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात 55 पोलिस पाटील यांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पोलिस आयुक्तांच्या सुचनेनुसार पोलिस पाटील यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. पोलीस पाटलांना प्रशिक्षण देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार हे प्रशिक्षण पार पडले यावेळी उपायुक्त शिवराज पाटील यांच्या सूचनेने या पोलीस पाटलांना कोविड यौद्धा पुरस्कार प्रदान करण्याचा उपक्रम देखील राबविण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दौडकर यांनी दिली.