अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची डोंबिवली मानपाडा येथे शाखा स्थापन,आरती पवार यांची डोंबिवली मानपाडा विभाग उपाध्यक्षपदी नियुक्ती.
पनवेल/प्रतिनिधी:अबोली महिला रिक्षा चालक संघटनेची घौडदौड सुरुच असून संघटनेची 8 वी शाखा डोंबिवली मानपाडा येथे स्थापन झाली आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांच्या प्रयत्नांनी जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोडल्या जात आहेत. डोंबिवली संघटनेत 16 सदस्य असून यामध्ये आणखी वाढ होणार आहे. तर दिवा येथे ही शाखा लवकरच स्थापन होणार आहे.
डोंबिवलीत मानपाडा शाखेमध्ये महिलांची संख्या वाढत असून येथील महिलांना भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी डोंबिवली मानपाडा विभागाच्या उपअध्यक्षपदी आरती पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी पनवेल, कळंबोली, कर्जत, खालापूर, कोपरखैरणे, कल्याण, बदलापूर नंतर आता पुन्हा डोंबिवली मानपाडा येथे 8 व्या शाखेचे स्थापन करण्यात करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत व डोंबिवली विभागातील उपाध्यक्ष आरती पवार व कल्याण विभागातील उपाध्यक्ष प्रिया ओव्हळ व डोंबिवली येथील रिक्षा चालक महिला उपस्थित होत्या. संघटनेतर्फे महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.