कळंबोली शहराच्या प्रवेशद्वारा पासून तेकामोठा बस स्टॉप,जाधव वाडी येथील सर्विस रोडवर त्वरित स्ट्रीट लाइट चालू करावेत शिवसेने सिडकोला दिले निवेदन.
पनवेल/ वार्ताहर : जिल्हा प्रमुख श्री शिरीष घरत साहेब व महानगर प्रमुख श्री रामदास शेवाळे साहेब यांच्या आदेशाने आणि विधानसभा समनव्यक श्री प्रदीप ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाने
कळंबोली शहराच्या प्रवेशद्वारापासून म्हणजेच शिवसेना शाखा ते कामोठा बस स्टॉप,जाधव वाडी येथील सर्विस रोडवर कोणत्याही प्रकारची लाईटची सुविधा नाही, त्यामुळे संध्याकाळनंतर सदरील रोडवर मोठ्या प्रमाणात अंधार पसरतो त्यामुळे तेथून नोकरीवरून संध्याकाळी येणार्या महिला वर्गांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागते व वळसा मारून कळंबोली वसाहतींमध्ये यावे लागते. तसेच सदरील सर्विस रोडवर अंधार असल्यामुळे एखाद्या गुन्हा घडण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.
या संदर्भात आज रायगड भवन, बेलापूर येथील *मा.कार्यकारी अभियंता श्री कांबळे साहेब* यांना निवेदन दिले व सदरील प्रकरणात लक्ष घालून वरील सर्विस रोड वर त्वरित स्ट्रीट लाइट चालू करावेत जेणेकरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल ही विनंती केली.
या निवेदन अर्जाची ची दखल घेत अभियंता साहेबानी त्वरित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना *श्री गिरीश धुमाळ(माजी विभाग संघटक), *श्री अक्षय साळुंखे(शहर संघटक,कलंबोली), *श्री आकाश शेलार *(विभाग प्रमुख,कलंबोली), *श्री पंकज पाटील* *(शाखा प्रमुख,कलंबोली)* उपस्थित होते