मालविडे क्रिकेट क्लब, आगाशी (M.C.C)आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा,ॲाल इंडीया सिफेरर्स चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे यांच्या हस्ते उदघाटन.
वार्ताहर : शुक्रवार दिनांक १२/१३/१४ फेब्रुवारी २०२१ या तीन दिवस आगाशी पूरापाडा ग्राउंड वर भरवण्यात आले आहे या स्पर्धेच्या आयोजना निमित्त प्रमूख पाहुणे म्हणून भारताला रिप्रेजेंट करणारे मास्टर्स ॲालिम्पिंक खेळाडू अमन चैाधरी तसेच ॲाल इंडीया सिफेरर्स चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रशांत भरत पाटील, पालघर संघटक अजय वर्मा व सामाजिक कार्यकर्ता दिलीप सांगळे, वसई विरार शहर महानगरपालिका माजी नगरसेविका रंजना थालेकर, सोमवंशी क्षत्रिय समाज माजी अध्यक्ष जयवंत कवळी व चिटणीस प्रफुल्ल म्हात्रे तसेच संदिप वर्तक व डॅा. बीजे राऊत असे मान्यवर उपस्थित होते. मालविडे क्रिकेट क्लब ने आयोजन केलेल्या स्पधैची रूपरेषा एक गाव एक संघ, ओपन संघ तसेच वाडवळ समाज संघ अशी असून पारितोषीकांची रूपरेशा प्रथम पारितोषिक ३०,००० व चषक, दुसरे पारितोषिक २०,०००/- व चषक, तिसरे पारितोषिक १०,०००/- व चषक अशी आहे.
वसई तालुक्यांतील बहुतांश गावाने आपापले संघ इथे नोंदवले आहे. खेळाडूचा ऊत्साह पाहता १ ल्या सामन्यांची सुरूवात करताना ग्राउंड वर नारळ फोडण्याचा मान हा अभिजीत सांगळे व टोस उडवून सामना सूरू करण्याचा मान हा भारतीय खेळाडू अमन चैाधरी यांनी करून सामन्यास सुरूवात केली.
वसई तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना पुढे चांगली संधी मिळावी व त्यांनी वसई तालूक्याचे नाव भारतात पुढे न्यावे असे प्रतिपादन ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केले.
मालविडे क्रिकेट क्लब या क्लब च्या स्वयंसेवकांनी कोवीड काळात झालेल्या मानसिक तणाव व खेळाडूंना चांगले प्रोत्साहन मिळावे म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले. या सामन्यांची सूरूवात झाली असून अंतिम सामना हा १४ फेब्रुवारी ला सायंकाळी ४ वाजता ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण करण्यात येतील.