पनवेल जवळील पाटनोली येथून जनरेटरची चोरी
पनवेल दि.14 (वार्ताहर)- पनवेल जवळील पाटनोली येथून अज्ञात चोरट्यांनी जनरेटर चोरून नेल्याची घटना घडली आहे.
पाटनोली येथून 15 केव्ही किर्लोस्कर कंपनीचा हिरव्या रंगाचा सिंगल फेज जनरेटर ज्याची किंमत जवळपास 20 हजार इतकी आहे. सदर जनरेटरअज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सानिब अली यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात केली आहे.