दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७० वाहतुक पोलिसांना केले सन्मानित.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र संघटक प्रमुख अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई, सरचिटणीस चंद्रकांत धडके उर्फ मामासाहेब, कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, सचिव मंगेश लाड यांच्या आदेशाने व महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे पनवेल तालुक्यात वाहतूक नियमन करणाऱ्या ७० वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, मच्छीन्द्र पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
