रिक्षाच्या धडकेत तरुण जखमी
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः एका भरधाव रिक्षाच्या धडकेत तरुण जखमी झाला असून या प्रकरणी रिक्षा चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्केश कदम हा तरुण पायी चालत असताना नवीन पनवेल माथेरान रोडवरुन भरधाव वेगाने जाणार्या रिक्षाने त्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कदम याच्या पायाला जबर जखम झाली आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.