लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे वृद्धांना फळे व बिस्कीट वाटप
पनवेल / प्रतिनिधी : दानशूर लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२१ रोजी नवीन पनवेल येथील साई आश्रय वृद्धाश्रम नवीन पनवेल येथे वृद्ध आजी – आजोबांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी वृद्धश्रमातील आजीचा वाढदिवस देखील आज केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी वृद्धाश्रमातील जेष्ठांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करून रामशेठ ठाकूर यांना भरभरून आशिर्वाद दिले.यावेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडीक, रयतराजाचे डायरेक्टर बलराम भडेकर, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, विजय दुन्द्रेकर, सुरेश भोईर, ओमकार महाडिक, साई आश्रय वृद्धश्रमाचे किरण पाटील, ज्योती पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.