शिवजयंतीनिमित्त छत्रपती सेनेतर्फे तयार केलेल्या विश्वविक्रमी टाकचे शाळकरी मुलींच्या हस्ते मंगळवारी (ता.१६) सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात अनावरण झाले.
पनवेल/प्रतिनिधी शुक्रवारी (ता.१९) शिवजयंती कार्यक्रमात विश्वविक्रम झाल्याचे प्रमाणपत्र वितरण होणार आहे.
छत्रपती सेनेतर्फे तयार होणाऱ्या वस्तूंचे विश्वविक्रम होण्याचे सलग तिसरे वर्ष आहे. २०१९ मध्ये त्यांनी जिरेटोप, तर २०२० शिवजन्मोत्सव सोहळ्यात भवानी तलवार तयार केली. यंदा त्यांनी सहा फुट रुंद आणि आठ फुट उंच विश्वविक्रमी टाक तयार केला. गुरुवारी (ता.१८) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत उद्यानराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, कोरोनाच्या वाढत्या परादुर्भावामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी येण्याची भीती लक्षात घेवून, दोन दिवस आधीच अनावारण करण्यात आले. शाळकरी मुलींनी टाकावरील पडदा हटविला. टाक ची वंडर बूक ऑफ रेकॉर्ड लंडन नोंद झाल्याचे सेनेचे कार्याध्यक्ष नीलेश शेलार यांनी सांगितले.
दिनांक १८ – ०२ -२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नाशिक सिबीएस येथे सकाळी १०:३० वाजता विश्वविक्रम नोंद कार्यक्रम छञपती सेना नाशिक
आयोजित शिवरायांचा तिसरा विश्वविक्रम भव्य टाक (प्रतिमा )
वजन – 70 kg
6 fit रुंद व 8 fit उंच
असलेल्या टाक प्रतिमेचे अनावरण झाले व
त्या नंतर विविध संस्था आणि कोरोना काळात उकृष्ट काम करण्याऱ्या चे सत्कार पदाधिकारी मार्फत करण्यात आले
तसेच छञपती सेना नाशिक यांनी १८ व १९ या दोन दिवस आरोग्य रोग निदान शिबिर देखील भरवले आहे.
सिंहासनाधिश्वर बहूउद्देशीय सेवा, नाशिक छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांनी निस्वाथीपणे समाजाची सेवा करून सामाजिक कार्य करणार्यासमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल शिवजन्मोउत्सव २०२१ निमित्त छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य यांचे संस्थापक अध्यक्ष चेतनभाऊ शेलार यांच्या हस्ते अभिजीत दिलीप सांगळे यांना सम्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.