उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने नवीन पनवेल सेक्टर 2 आणि 3 मध्ये फुटपाथच्या कामाला सुरवात
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः नवीन पनवेल येथील सेक्टर 2 आणि 3 मधील नागरिकांनी फुटपाथ च्या होत असलेल्या दुर्दशा बद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे समस्या मांडली होती; नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सदर विषयाची गंभीर दखल घेत सिडको च्या अधिकार्यांना फुटपाथ बनवण्यासाठी पत्र दिले आणि सतत पाठपुरावा करून फुटपाथ बनवण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून घेतली.
माझा प्रभाग माझी जवाबदारी या अनुषंगाने काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभाग 18 मधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच तत्परता दाखवत असतात. आरोग्य,साफ सफाई, पाणीपुरवठा, लाईट चा विषय असो की रस्ते आणि फुटपाथ बांधणे विषय असो,जो पर्यंत समस्येचे निरसन होत नाही तो पर्यंत पाठपुरावा करत राहतात; त्याचाच प्रत्यय यानिमित्ताने पुन्हा आला आहे. नवीन पनवेल सेक्टर 2 आणि 3 मधील नागरिकांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.