उलव्यातील फुटपाथ वरील अतिक्रमणे व बेकायदेशीर आठवडा बाजार बंद करण्यासाठी एकदिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन
उलवे : उलवे हे आधुनिक शहर विकसित करत असताना येथील प्रशस्त रस्ते, सुसज्ज फुटपाथ, मैदाने, उद्याने, रेल्वेस्थानक आदीची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु असे असले तरी येथील रहिवाश्यांना व प्रकल्पग्रस्त व्यवसाईकांना हे शहर असुरक्षित वाटू लागले आहे. येथील फुटपाथ रहदारीचे रस्ते अनधिकृत टपर्याा चिकन-मटणाच्या दुकानांनी कब्जा करून व्यापल्याने नागरिकांचा फुटपाथ वरुन चालण्याचा हक्क हिरावून घेतला आहे. तसेच बेकायदेशीर आठवडा बाजारमुळे गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सिडकोच्या प्रशासनातील ढिसाळ व भ्रष्टाचारी कारभारामुळे शहराचे विद्रूपिकरन झाले आहे. म्हणून भूखंड आरक्षित करा, बेकायदेशीर आठवडा बाजार बंद करा, फुटपाथवरील अतिक्रमणे तत्काळ हटवा, स्थानिक प्रकल्पग्रस्तांना व्यवसायासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्द करून द्या, उलवे नोड मधील दिव्यांग, विधवा, निराधार महिलांना विशेष म्हणून व्यवसायासाठी काम स्वरूपी जागा द्या, उलवे शहर ना फेरीवाला क्षेत्र घोषित करा या प्रमुख मागण्यांसाठी सिडको व प्रशासनातील भ्रष्टाचारा विरुद्ध, सिडको प्रकल्पग्रस्त हक्क प्रस्तापित समिति उलवे यांच्या वतीने एक दिवशीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.