खाजगी बसच्या धडकेत महिला जखमी
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः एका खाजगी बसच्या धडकेमुळे दुचाकीवरील एक महिला खाली पडून ती जखमी झाल्याची घटना तालुक्यातील कर्नाळा खिंडीतील कर्नाळा अभयारण्याजवळ घडली आहे.
जयवंत म्हात्रे आणि संजना म्हात्रे हे दोघेजण दुचाकीवरुन गोवा-पनवेल महामार्गावरुन कर्नाळा अभयारण्य खिंडीतून जात असताना एका वळणावर पाठीमागून आलेल्या खाजगी बसने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात ते दोघेजण खाली पडले. त्यात संजना म्हात्रे यांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर बस चालक बस घेवून पसार झाल्याने त्याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.