गिर्हाईक म्हणून दुकानात आले आणि चेन लांबविली
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः दोघे इसम सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने एका ज्वेलर्सच्या दुकानात आले व लबाडीने जवळपास 1 लाख 10 हजार रुपये सोन्याची चेन लांबविल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे.
तळोजा येथील सेक्टर 23 या ठिकाणी कैलासचंद्र लक्ष्मीलाल सोनी यांचे ज्वेलर्सचे दुकान असून त्या ठिकाणी एक इसम व त्याच्या सोबत एक काळा बुरखा घातलेली महिला आले व त्यांनी सोने खरेदी करण्याचा बहाणा करून फिर्यादीने दाखविलेली 1 लाख 10 हजार रुपये सोन्याची चेन लबाडीने चोरुन ते त्यांच्या जवळ असलेल्या दुचाकीवरुन पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.