शेकडो तरुणांनी भगवा ध्वज हाती घेवून केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
पनवेल, दि.25 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली, पनवेल महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील यांच्या आयोजनाने खारघर व कामोठे शहरातील नितीन शिंदे व संदीप कराळे यांच्या सोबत शेकडो युवकांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.
त्याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख कामोठे राकेश गोवारी, उपशहर प्रमुख कामोठे संतोष गोळे, कळंबोली विभाग प्रमुख कृष्णकांत कदम, जेष्ठ शिवसैनिक गिरीश गुप्ता, सोनार काका, सखाराम केंद्रे आदि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.