छत्रपती उदयनराजे यांना वाढदिवसाची अनोखी भेट. राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यकर्ता निघाला पनवेल – सातारा जलमंदिर पायी.
पनवेल / प्रतिनिधी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांचा नुकताच 24 फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनेकांनी त्यांना निरनिराळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या मात्र राजे प्रतिष्ठान कामगार सेना पनवेल – रायगडतर्फे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून छत्रपती उदयनराजे भोसले यांना भेटण्यासाठी पनवेल ते सातारा जलमंदिर येथे राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचा कार्यकर्ता विजय शिंदे हा पायी चालत निघाला आहे. यावेळी त्याला कार्याध्यक्ष प्रकाश कोळी, केवलदादा महाडिक, सुनील वरेकर, प्रशांत पिसाळ, सदाशिव मोरे, किरण पालये यांनी भेटून शुभेच्छा दिल्या व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.