मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी करून घेतली कचरा व ड्रेनेज सफाई.
पटेल पार्क मधील रेडेवलपमेंट साठी बंद इमारतीच्या मागच्या बाजूला ड्रेनेज लाईन फुटल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले हॊते.डासांचा आणि दुर्गंधीचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला होता.नागरिकांनी आपली समस्या कार्यक्षम नगरसेवक तसेच मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांना सांगितली.नागरिकांच्या आरोग्यविषयक धोका लक्षात घेऊन त्वरित महापालिका अधिकाऱ्यांना सांगून सफाई करून घेतली व जंतुनाशक पावडर सफाई केलेल्या जागेवर मारून घेतली.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारा नगरसेवक लाभल्या बद्दल प्रभागातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.