शिवसेनेच्या अथक प्रयत्नाने पनवेल महापालिका हद्दीत सर्वत्र टॉयलेटची सुविधा उपलब्ध
पनवेल दि.4 (वार्ताहर):सिडको नवी मुंबई शहराची निर्मिती केल्यानंतर कुठेही कोणत्याच सिडको नोड मध्ये सार्वजनिक स्वच्छता ग्रहाची सोय केलेली नव्हती. त्यामुळे नागरिकांना अत्यंत त्रास व गैरसोय सहन करावी लागत होती. पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पनवेल, खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, नवीन पनवेल पूर्व पश्चिम व पनवेल महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये ज्येष्ठ शिवसैनिक सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी २०१८ पासून सार्वजनिक शौचालयाची व ई टॉयलेटची सर्वत्र सोय करावी याकरता पनवेल महापालिका आयुक्त. व्यवस्थापकीय संचालक सिडको. यांच्यासह नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , प्रधान सचिव नगर विकास, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. महापालिकेकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे व सिडकोच्या दुर्लक्षामुळे दिरंगाईमुळेद पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोड मधील व ग्रामीण भागातील महापालिका क्षेत्रातील राहणाऱ्या नागरिकांची व विशेषत महिलांची होणारी अडचण व त्रास विष्णू गवळी यांनी खासदार श्रीरंग आप्पा बारणे शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या निदर्शनास आणून दिली व सहकार्याची विनंती केली होती. विष्णू गवळी यांनी शिवसेनेच्या वतीने केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन खासदार श्रीरंग बारणे व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी व्यवस्थापकीय संचालक सिडको , नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, प्रधान सचिव नगर विकास ii यांच्यासह राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही साकडे घातले होते. राज्य सरकार चे आदेश पनवेल महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर शिवसेनेच्या मागणीनुसार पनवेल महानगरपालिकेने खारघर विभागात ११ टॉयलेट, कळंबोली विभागात 2, कामोठे विभागात ४, पनवेल विभागात ३, असे वीस टॉयलेट्स खरेदी करून बसविले आहेत. त्याचप्रमाणे भारत स्वच्छता अभियान अंतर्गत पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर विभागात ६, कळंबोली विभागात ५, कामोठे विभागात ३, असे एकूण१४ कंटेनर टॉयलेट खरेदी करून बसविले आहेत. त्याचप्रमाणे नवीन पनवेल पूर्व पश्चिम कामोठे, कळंबोली विभागात १५ कंटेनर टॉयलेट्स प्रस्तावित असल्याचे पनवेल महापालिकेने लेखी पत्र पाठवून गवळी यांना कळविले आहे. शिवसेनेच्या सातत्याच्या पाठपुराव्याने काही प्रमाणात महापालिकेने हा प्रश्न अल्प प्रमाणात सोडवला असून यापुढेही महापालिकेने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत किंवा इतर कोणत्याही योजनेखाली नवीन पनवेल पूर्व, पश्चिम च्या खांदा कॉलनी व ग्रामीण भागातील समाविष्ट गावांमध्ये ई टॉयलेटची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, यासाठी महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य व पाठपुरावा करण्यात येईल असे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी व जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी स्पष्ट केले आहे.