कामोठे वसाहतीमध्ये प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करणाऱ्याविरूद्ध धडक कारवाई
पनवेल दि.09 (वार्ताहर)-कामोठे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पान टपरी व इतर दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यात येत होती. यांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने तसेचकामोठे पोलिस ठाण्याने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात विक्रीस बंदी असलेला माल हस्तगत केला आहे.
महाराष्ट्रातप्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यास बंदी असतानाही छुप्या मार्गाने सदर माल इतर राज्यातून आणून कामोठे वसाहतीत अनेकपान टपरी व इतर दुकानांमध्ये त्याची सर्रास विक्री केली जात होती. याबाबतच्या अनेक तक्रारी स्थानिक रहिवाशांनी अन्न व औषध प्रशासनाकडे केल्यानंतरकामोठे पोलिस ठाण्याच्या वपोनि स्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने वसाहतीमधील वेगवेगळ्या दुकानांवर धडक कारवाई करून जवळपास 57, 75, 50 रू. किंमतीचा माल हस्तगत करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे अशा प्रकारे बेकायदेशीररित्याछुप्या मार्गाने विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.