मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांच्या प्रयत्नाने अमरधाम स्मशानभूमी च्या गॅस दाहिनी चिमणीची उंची वाढवण्यात आली
पनवेल / प्रतिनिधी :प्रभाग क्र १८ मधील येणाऱ्या अमरधाम स्मशानभूमीच्या गॅस दहिनी चा वापर खूप कमी वेळा होत असे. परंतु करोना काळात मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे गॅस दाहिनी मध्ये अंत्यविधी जास्त प्रमाणात होऊ लागले होते.गॅस दाहिनी च्या चिमणीची उंची कमी असल्या कारणाने धुराचा प्रभाव १ किमी अंतरापर्यंत जाणवायला लागला होता. धुरामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता तसेच धुरामुळे सर्वांना घरांच्या खिडक्या बंद करूनच बसावे लागत होते.या चिमणीची उंची वाढवावी किंवा धूर हवेत मिसळला जाणार नाही असे एखादे तंत्रज्ञान विकसित करून नागरिकांची या समस्येतुन सुटका करावी याबाबत चे पत्र नगरसेवक विक्रांत पाटील यांनी आकुयतांना दिले होते त्याचबरोबर या विषयाचा यशस्वी पाठपुरावा करून अमरधाम गॅस दाहिणीच्या चिमणीची उंची वाढवून घेतली व कामाला ही सुरुवात करून घेतली.नगरसेवक विक्रांत पाटील आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आत्मीयतेने घेतात त्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.