स्वीफ्ट गाडीची रिक्षास धडक ; 1 जखमी
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल जवळील करंजाडे ब्रीज येथून रिक्षा घेवून जात असताना विरुद्ध बाजूने आलेल्या स्वीफ्ट गाडीने सदर रिक्षास धडक दिल्याने रिक्षा चालक जखमी झाल्याची घटना घडली आहे.
विजय काकडे (23) रा.करंजाडे, हा त्याच्या ताब्यातील रिक्षा घेवून ब्रीज मार्गे उतरत असताना विरुद्ध बाजूने आलेल्या स्वीफ्ट गाडीने त्याच्या रिक्षा धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजय काकडे हा स्वतः जखमी झाला आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.