कळंबोली वाहतूक पोलीस विभाग येथे रुजू असलेले व नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळालेले मा.श्री.भरत साळुंखे यांची पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या
पनवेल, दि.13 नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील कळंबोली वाहतूक पोलीस विभाग येथे रुजू असलेले व नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळालेले मा.श्री.भरत साळुंखे यांची आज छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेने भेट घेऊन घेऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, खांदा कॉलनी उपाध्यक्ष सदाशिव मोरे व ओमकार महाडिक आदी उपस्थित होते.